पोहरादेवी, शीख समाजाचे नववे गुरु,हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहिदी कार्यक्रम सोहळ्याचा भव्य समारंभ पोहरादेवी धर्मपीठावर भाविकांच्या अलोट उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यात धर्मपीठाधीश्वर बाबुसिंगजी महाराज, अखिल भारतीय धर्मजागरणचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदराव ढोले,धर्मगुरू महंत कबीरदासजी महाराज,धर्मगुरू जितेंद्रजी महाराज,आरोग्य दूत मा.रामेश्वरजी नाईक साहेब,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासभाऊ राठोड,राष्ट्रीय महासचिव ॲड.पंडितभाऊ राठोड,प्रदेशाध्यक्ष मा.भिकनभाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. पी.टी. चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते मा.मधुकरराव जाठोत,युवा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मा.श्रीमंतराजे चव्हाण, प्रदेश सचिव उमेश राठोड, उपाध्यक्ष श्रावण पवार यांच्या सह विविध संत-महंत, धर्मगुरू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड यांनी केलेले प्रभावी सूत्रसंचालन. त्यांच्या ओघवत्या वाणीने, शेरोशायरी व भक्तिमय शैलीत केलेल्या सूत्रसंचालना मुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालना बद्दल धर्मपीठाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आपल्या मार्गदर्शनात बंजारा हृदय सम्राट,धर्मनेता,भगवंत सेवक मा.किसनभाऊ राठोड यांनी गुरु तेग बहादुर जींच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली. मुघल सम्राट औरंगजेबाच्या अत्याचारांना न जुमानता गुरुजींनी धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान आणि बाबा लक्खीशाह बंजारा यांनी दाखविलेली अद्वितीय निष्ठा याचे भावपूर्ण स्मरण करण्यात आले. “गोर बंजारा आणि लभाणा समाज तसेच शीख बांधवांतील गुरु-बंधुत्व अधिक दृढ होणार आहे,” असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले। कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.रामेश्वरजी नाईक यांनी आगामी काळात महाराष्ट्रभर अशाच प्रकारचे संत प्रवास, धर्मजागरण कार्यक्रम राबविण्याची माहिती दिली. व बंजारा समाजासाठी विविध योजना अंमलात आणण्याचे अभिवचन दिले। या द्विदिवसीय कार्यक्रमात समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.अनेक भाविकांनी स्वयंप्रेरणेने राष्ट्रीय बंजारा परिषदेत प्रवेश केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्याम भाऊ राठोड, नारायण भाऊ चव्हाण, नामदेव आडे व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष मा. भिकनभाऊ जाधव यांनी केले.व उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रेमकिसन राठोड यांनी केले।
उत्कृष्ट सूत्रसंचालना बद्दल प्रेमकिसन राठोड यांचा सत्कार।
News Publisher
